शेतकरी आपला धान्य माल प्रामुख्याने अडत्यांच्या माध्यमाने विकत असतो. मात्र अडत्यांना शेतक-यांना धान्यमाल सुरक्षीत ठेवायचा झाल्यास त्यांच्याजवळ जागेची अडचण येत असते. त्याच प्रमाणे समितीचे यार्डवर धान्यमाल विक्री करीता आनणाऱ्या शेतकऱ्यांना वेळीच धान्यमालाचा चुकारा मिळण्याचे दृष्टिने कास्तकारांनी आणी अडत्यांना सोयीचे होईल ही बाब लक्षात घेवुन व ज्या अडत्यांना आवश्यकता आहे अशा अडत्या व व्यापाऱ्यांकरीता व्यापारी गाळे समितीकडे असुन आवश्यकता लक्षात घेता आणखी गाळे बांधकाम करण्याचा समितीचा मानस आहे.
