समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार, समुद्रपूर येथे १.५७ हे. आर जागा प्रमुख बाजार आवारा करीता विभाजना पूर्वी खरेदी केलेली होती. समुद्रपूर हे गाव जाम-उमरेड रोडवर आहे. समितीच्या समुद्रपूर येथील प्रमुख आवारात १. कार्यालयीन ईमारत २. लिलाव गृह ३. व्यापारी गाळे ४. लिलावगृह ओपन ओटयासह ५. पिण्याच्या पाण्यासाठी थंड शितपेय प्याउ (वॉटर कुलर] ६. बोरवेल ७. कंपाउंड ८. विजेची व्यवस्था ९. अंतर्गत रस्ते १०.शेतकरी निवास ११ भारतीय स्टेट बॅक इत्यादी बांधकाम सोयी उपलब्ध केलेल्या आहे.
समितीने मुख्य आवार येथे धान्य आवक पाहता व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने शेडचे सिमेंटीकरन व लिलाव गृहावरीलोडचे बांधकाम पुर्ण झालेले असुन व्यापारी गाळे, गोदाम बांधकाम, स्वच्छता गृह, १० हजार लिटर पाण्याची टाकी, धर्म काटा, कार्यालय बांधकाम, करण्याचा समितीचा मानस आहे.
