कृषि उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर मध्ये आपले स्वागत आहे.

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर, जिल्हा वर्धा

समुद्रपूर हे गाव तालुक्याचे गाव असून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका पातळीवर बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. मा. जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, वर्धा यांचे अधिसुचना क्रंमाक/नियमन/विभाजन कृउबास/हिंगणघाट/४२५४/९७ दिनांक १६ जुलै १९९७ तसेच महाराष्ट् राजपत्र दिनांक १६ जुलै १९९७ नुसार हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्यात येवून समुद्रपूर तालुक्याकरीता स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. दिनांक १९/०५/२०२३ ला सध्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळानी सुत्रे हाती घेतलेले आहे. त्यात सभापती मा.श्री. हिम्मतराव शामरावजी चतुर व उपसभापती मा.श्री. वामणराव पांडुरंगजी चंदनखेडे पदभार सांभाळीत आहेत.

समुद्रपूर हे गाव जाम-उमरेड रोडवर असून या गावात आवश्यक त्यासोयी उपलब्ध आहेत. समुद्रपूर तालूक्यामध्ये एकुण २२२ गावे असून हया बाजार समिती अंतर्गत समुद्रपूर, नंदोरी, कांढळी, जाम, धोंडगांव, उब्दा, दहेगांव व साखरा हया कापूस संकलन केंद्राचा समावेश आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा.श्री. हिम्मत शामरावजी चतुर

सभापती

मा.श्री. वामण पांडुरंगजी चंदनखेडे

उप सभापती

मा. श्री. शंकर हरीभाउ धोटे

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

कापूस खरेदीदार
११
अडत
१७
मापारी
११
धान्य खरेदीदार
१४
कापूस प्रक्रिया परवाना

महत्वाच्या लिंक्स