समितीचे मांडगाव येथे उपबाजार असुन त्या ठिकाणी समितीचे मालकीची ४ एकर जागा असुंन या जागेवर धान्य खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरू करण्याकरिता उपबाजार आवाराचे ठिकाणी अदयावत गोदाम, कार्यालय, धान्यविक्री करीता ग्रेनशेड संपुर्ण यार्ड भोवती कंम्पाऊट, चेकपोष्ट, मुख्य प्रवेश व्दार हाती घेण्यात आलेले होते. आणि उपरोक्त बांधकाम पुर्ण करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे उपबाजार आवाराचे ठिकाणी पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोरवेल करण्यात आलेली असुन त्यावर सवमर्शिबल पंप बसवुन पिण्याच्या पाण्याची भरपुर सोय करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी इलेक्ट्रीफिकेशन व डब्लु. बी. एम रोड व स्लॅब कल्व्हर्टचे बांधकाम पुर्ण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मांडगाव उपबाजार आवारामध्ये गुरेढोरे यांचे पासुन सुरक्षेच्या दृष्टिकोणातुन हाफ वॉल तार कम्पाउंड व चेकपोष्ट चे बांधकाम सुध्दा पुर्ण करण्यात आलेले आहे. तसेच गुरेढोरे यांना पिण्याचे दृष्टिने हौदाचे बांधकाम सुध्दा बाजार समितीने पुर्ण केलेले आहे.
