समुद्रपूर हे गाव तालुक्याचे गाव असून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका पातळीवर बाजार समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. मा. जिल्हा उपनिबंधक, सह. संस्था, वर्धा यांचे अधिसुचना क्रंमाक/नियमन/विभाजन कृउबास/हिंगणघाट/४२५४/९७ दिनांक १६ जुलै १९९७ तसेच महाराष्ट् राजपत्र दिनांक १६ जुलै १९९७ नुसार हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करण्यात येवून समुद्रपूर तालुक्याकरीता स्वतंत्र बाजार समितीची स्थापना करण्यात आली आहे. दिनांक १९/०५/२०२३ ला सध्या अस्तित्वात असलेल्या संचालक मंडळानी सुत्रे हाती घेतलेले आहे. त्यात सभापती मा.श्री. हिम्मतराव शामरावजी चतुर व उपसभापती मा.श्री. वामणराव पांडुरंगजी चंदनखेडे पदभार सांभाळीत आहेत.
समुद्रपूर हे गाव जाम-उमरेड रोडवर असून या गावात आवश्यक त्यासोयी उपलब्ध आहेत. समुद्रपूर तालूक्यामध्ये एकुण २२२ गावे असून हया बाजार समिती अंतर्गत समुद्रपूर, नंदोरी, कांढळी, जाम, धोंडगांव, उब्दा, दहेगांव व साखरा हया कापूस संकलन केंद्राचा समावेश आहे.
समुद्रपुर कृषि उत्पन्न बाजार समितीचे परिक्षेत्रात कापुस, सोयाबिन, तुर, जवस, ज्वारी, मुंग, तिळ, उडीद, चना, इत्यादी पिकांचे उत्पादन होते. कापुस या पिकासाठी परवानाधारक व्यापारी यांचे अंतर्गत नंदोरी, जाम, कांढळी, धोंडगांव व उब्दा, येथे कापुस संकलन केंद्रे उघडण्यात आलेली असुन जाम, नंदोरी, कांढळी, धोंडगांव, उब्दा येथे आधुनिक पध्दतीची जिनिंग व प्रेसिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. बाजार समितीने शेतमाल खरेदी करीता समितीचे बाजार आवारात समुद्रपुर या ठिकाणी शेतमाल सोयाबिन, तुर, गहु, ज्वारी, चना इ. धान्यमाल समितीचे आवारात विक्री करीता येत असुन लिलाव पध्दतीने शेतमालाची विक्री होत आहे. तसेच शेतमालाची सुध्दा खुल्या पध्दतीने विक्री होत आहे. हया करीता समितीचे व्यापारी, अडत्ये, सहाय्यक, मापारी, हमाल यांना परवाना देण्यात आलेले असुन त्यांना समितीच्या वतीने परवाना प्रदान करण्यात आलेला आहे. समुद्रपुर बाजार समितीचे आवारात मालाची विक्री झालेली असुन व्यापाऱ्यांकडुन सेस चे स्वरूपात आमदानी प्राप्त झालेली आहे.
